दिलीप वळसे पाटील अचानक शरद पवारांच्या भेटीला

Foto
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीचा एक फोटोही समोर आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

या अत्यंत महत्त्वाच्या भेटीनंतर स्वतः शरद पवार यांनी समाजमाध्यमांवरून माहिती दिली. शरद पवार म्हणाले, ङ्गङ्घराज्याचे माजी गृहमंत्री व आमदार दिलीपराव वळसे-पाटील यांनी मुंबई येथील सिल्व्हल ओक या माझ्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील ज्वलंत कांदा प्रश्न, सहकार क्षेत्र व सहकारी संस्थांशी निगडीत विविध विषय, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातील वेगवेगळ्या विषयांवरती सखोल चर्चा केली.ङ्घङ्घ ही भेट वरकरणी बिगरराजकीय वाटत असली, तरी सध्याच्या बदलत्या समीकरणांमुळे या भेटीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

तटकरे-प्रफुल्ल पटेल यांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
दरम्यान, १२ मे रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. इतकेच नव्हे, तर तटकरे यांच्या आधी प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या भेटीवरून एक मोठा दावा केला होता. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे महायुतीत असून आगामी निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे, असा दावा रोहित पवारांनी केला होता. आता दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.